वारसा : एथनिक नॉलेज हेरिटेज सोसायटी द्वारा क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली व श्रीमती राधाबाई सारडा कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अंजनगाव सुर्जी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन.
वारसा : एथनिक नॉलेज हेरिटेज सोसायटी द्वारा क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन.
सारडा महाविद्यालयात वैदुंसाठी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित.
१५ वैदुंचा सत्कार व महाराष्ट्रातील ८ महाविद्यालयांशी सामंजस्य करार.
स्थानिक - अंजनगाव सुर्जी येथील वारसा एथनिक नॉलेज हेरिटेज सोसायटी द्वारा क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली व श्रीमती राधाबाई सारडा कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अंजनगाव सुर्जी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील पारंपारिक वैदुंसाठी व्हालंटरी सर्टिफिकेशन स्किम फॉर ट्रॅडिशनल कम्युनिटी हेल्थ प्रोव्हायडर्स यावर वारसा सोसायटीच्या उद्घाटन प्रसंगी प्रशिक्षण कार्यशाळेचे 2 जुलै 2022 रोजी आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. एस. एच. पाटील, अध्यक्ष, जैव- विविधता मंडळ, महाराष्ट्र राज्य यांनी केले. आपल्या उद्घाटनपर भाषणात अशा प्रकारच्या प्रशिक्षण कार्यशाळेच्या आयोजनामुळे पारंपारिक वैदू लोकांना राजमान्यता मिळून त्यांना आपल्या ज्ञानाचा वारसा कायम ठेवता येईल असे प्रतिपादन केले. डॉ. प्रभा भोगांवकर, अध्यक्ष वारसा यांनी उपस्थितांना संस्थेच्या उद्दिष्टांबद्दल माहिती दिली व या उद्दिष्टांवर संपूर्ण महाराष्ट्रभर कार्य करण्यात येईल तसेच प्रामुख्याने आदिवासी आणि ग्रामीण समाजासाठी संस्था कार्य करणार आहे असे सांगितले. डॉ. मंगेश डगवाल सचिव वारसा यांनी प्रास्तविकातून कार्यशाळेचा उद्देश वैदू लोकांना राजमान्यता व प्रमाणीकरणासाठी मदत करणे हा असल्याचे स्पष्ट केले. तसेच सोसायटीचा महाराष्ट्रातील ८ विविध महाविद्यालयांसोबत सामंजस्य करार करीत असल्याची माहिती दिली.
कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वशिष्ट चौबे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून औषधी वनस्पतींचे पारंपारिक ज्ञान सोसायटीच्या माध्यमातून जतन करता येईल असे सांगितले. उद्घाटनाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री सारडा एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. अमर सारडा यांनी औषधी वनस्पतींचा वापर करून रक्तस्त्राव थांबविण्यासाठी लेप तयार करण्यासाठी संशोधन करावे असे वारसाच्या सदस्यांना आवाहन केले. उद्घाटन प्रसंगी उपस्थित वैदुंचा सत्कार करण्यात आला. वारसाचे पदाधिकारी डॉ.पंकज ढोले, शास्त्रज्ञ, बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया, कलकत्ता यांचा त्यांच्या संशोधनास डी. सी. पाल राष्ट्रीय पारितोषिक मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. उद्घाटन समारंभाचे संचालन डॉ. विनोद देवरकर यांनी केले व डॉ. प्राची क्षीरसागर यांनी आभार प्रदर्शन केले.
उद्घाटनानंतर पहिल्या प्रशिक्षण सत्रात क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे संचालक व प्रमुख पी.ए.डी. डी. विभाग, श्री मनीष पांडे यांनी वैदूंनी व्हालंटरी सर्टिफिकेशन साठी काय करावे त्यासाठी कोणते निकष आहेत व या योजनेचा त्यांना काय फायदा होऊ शकतो याबद्दल सविस्तर मार्गदर्शन ऑनलाइन दिले. सदर प्रमाणीकरण जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशनानुसार असणार असल्याने उपस्थित सर्व वैदूंनी असे ऐच्छिक प्रमाणीकरण करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन देखील केले. या सत्राचे संचालन वारसाचे कोषाध्यक्ष डॉ. उमेश कनेरकर यांनी केले.
दुसऱ्या प्रशिक्षण सत्रात डाबर इंडिया लिमिटेड या औषध कंपनीचे श्री.अशोक ढोबळे यांनी ऑनलाईन मार्गदर्शन करून वैदूंना भेटीदाखल गीलोय- नीम रसाचे मिश्रणाच्या डाबरच्या बाटल्या दिल्या. नंतर डॉ. प्रभा भोगांवकर यांनी प्रमाणीकरणाचे निकष विस्तृतपणे समजावून सांगितले. वैदूंशी संवादातून त्यांना पारंपारिक उपचार पद्धती सन्मान प्रदान करण्यासाठी प्रमाणीकरण कसे महत्त्वाचे आहे ते सांगितले. तसेच परस्पर संवादातून त्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या. या सत्राचे संचालन डॉ. संजय सातपुते व डॉ. विठ्ठल कदम यांनी केले. सर्व सहभागी वैदूंना कार्यशाळेचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
सदर प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनाला प्रामुख्याने शासकीय फार्मसी कॉलेज, अमरावती येथील प्राचार्य डॉ. खडबडी, डॉ. माने, निवृत्त शास्त्रज्ञ, भारतीय पुरातत्व विभाग, डॉ. रोडे, निवृत्त संचालक, वित्त लेखा सेवा महाराष्ट्र प्रशासन, श्री. संजय सारडा, सारडा मल्टी स्पेशालिस्टी हॉस्पिटलच्या संचालक डॉ. माधुरी सारडा, संगई अरोमाचे संस्थापक श्री. विवेक संगई व प्रा. डॉ. दिनेश खेडकर उपस्थित होते.
सदर उद्घाटनपर कार्यशाळेच्या आयोजनाकरिता संस्थेच्या अध्यक्ष डॉ. प्रभा भोगांवकर, उपाध्यक्ष डॉ. विठ्ठल कदम, सचिव डॉ. मंगेश डगवाल, सहसचिव डॉ. प्रदीप सौदागर, कोषाध्यक्ष डॉ. उमेश कनेरकर व सदस्य डॉ. अशोक देवरे, डॉ. संजय सातपुते, डॉ. विनोद देवरकर, डॉ. विशाल मराठे, डॉ. संध्या कडू, डॉ. विनोद चव्हाण, डॉ. युगंधरा राजगुरे, डॉ. स्मिता लांडे, डॉ. प्राची क्षिरसागर, डॉ. पंकज ढोले व श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी ज्या आठ महाविद्यालया सोबत सामंजस्य करार करण्यात आला त्यांना त्या कराराच्या प्रती हस्तांतरित करण्यात आल्या. यामध्ये श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालय अंजनगाव सुर्जी, सायंस कॉलेज नांदेड, मॉडर्न कॉलेज, गणेशखिंड, पुणे, श्री छत्रपती शिवाजी काॅलेज, उमरगा, महात्मा फुले विद्यालय वरूड, आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज मारेगाव, जी. एस. टोम्पे कॉलेज चांदुर बाजार व इन्नानी महाविद्यालय कारंजा लाड यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सामंजस्य कराराच्या माध्यमातून औषधी वनस्पती लागवड व संवर्धन, रानभाज्या याबद्दलची जनजागृती व संस्थेच्या उद्दिष्टांवर कार्य करण्यात येईल
डॉ. मंगेश डगवाल सचिव,वारसा एथनिक नॉलेज हेरिटेज सोसायटी,अंजनगाव सुर्जी
.jpeg)

Comments
Post a Comment