वारसा : एथनिक नॉलेज हेरिटेज सोसायटी द्वारा क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली व श्रीमती राधाबाई सारडा कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अंजनगाव सुर्जी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन.
वारसा : एथनिक नॉलेज हेरिटेज सोसायटी द्वारा क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन. सारडा महाविद्यालयात वैदुंसाठी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित. १५ वैदुंचा सत्कार व महाराष्ट्रातील ८ महाविद्यालयांशी सामंजस्य करार. स्थानिक - अंजनगाव सुर्जी येथील वारसा एथनिक नॉलेज हेरिटेज सोसायटी द्वारा क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली व श्रीमती राधाबाई सारडा कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अंजनगाव सुर्जी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील पारंपारिक वैदुंसाठी व्हालंटरी सर्टिफिकेशन स्किम फॉर ट्रॅडिशनल कम्युनिटी हेल्थ प्रोव्हायडर्स यावर वारसा सोसायटीच्या उद्घाटन प्रसंगी प्रशिक्षण कार्यशाळेचे 2 जुलै 2022 रोजी आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. एस. एच. पाटील, अध्यक्ष, जैव- विविधता मंडळ, महाराष्ट्र राज्य यांनी केले. आपल्या उद्घाटनपर भाषणात अशा प्रकारच्या प्रशिक्षण कार्यशाळेच्या आयोजनामुळे पारंपारिक वैदू लोकांना राजमान्यता मिळून त्यांना आपल्या ज्ञानाचा वारसा कायम ठेवता येईल असे प्रतिपादन केले. डॉ. प्रभा भोगांवकर, अध्यक...